Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खर तर, भारतात रेल्वे हे एक प्रवासाचे मुख्य साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे.
रेल्वे प्रवास खिशाला परवडणारा असल्याने आणि याचे नेटवर्क देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जाते.
दरम्यान, मुंबई ते दिल्ली असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर आहे. कारण की, हा प्रवास आता अधिक जलद होणार आहे. आता रेल्वेने मुंबई ते दिल्ली हा प्रवास अवघ्या बारा तासात पूर्ण होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे मार्ग मिशन रफ्तार अंतर्गत तयार केला जात आहे. यानुसार या मार्गावर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे.
या मार्गावरील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणा अपग्रेड केल्या जात आहेत. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर मानवरहित क्रॉसिंग बंद करण्यात आले आहे.
मार्गावर जनावरे घुसू नये यासाठी धातूचे कुंपण तयार केले आहे. 80 टक्क्याहून अधिक स्विचकर्व नव्याने बसवण्यात आले आहेत.
यामुळे ट्रेन गती कमी न करता ट्रॅक बदलेल असे सांगितले जात आहे. या मिशन रफ्तार मुळे या मार्गावर ताशी 160 किलोमीटरच्या वेगाने रेल्वे गाड्या धावणार आहेत.
शताब्दी राजधानी तेजस दुरांतो यांसारख्या विविध एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार आहे. सध्या स्थितीला मुंबई ते दिल्ली हा प्रवास करण्यासाठी 16 तास लागतात.
पण हे मिशन रफ्तार चे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास चार तासांनी कमी होणार आणि अवघ्या बारा तासात मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवास करता येणार असे सांगितले जात आहे.
दरम्यान 6,661 कोटी रुपये खर्च करून केली जाणारी ही सर्व कामे आता मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मार्च 2024 पासून या मार्गावर जलद गतीने प्रवास करता येणार आहे.