Mumbai Railway News : सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नवरात्र उत्सवाची संपूर्ण देशात मोठी धूम पाहायला मिळत आहे. कुठे गरबा कुठे दांडिया तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण देश गजबजुन उठला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
सणासुदीच्या काळात मात्र रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशाची गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना थोडीशा गैरसोयीचा सामना देखील करावा लागत आहे. अशातच मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे.
ही बातमी मुंबई सह भुसावळ रेल्वे भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसात थोडीशी चिंता वाढवणारी आहे. कारण की मुंबईहून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे या दोन गाड्या जवळपास जानेवारी 2024 पर्यंत रद्द राहणार आहे.
याचा परिणाम म्हणून रेल्वे प्रवाशांना नवरात्र उत्सवाच्या आणि दिवाळी सणाच्या काळात प्रवास करताना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील प्रयागराज रेल्वे स्टेशनवर सध्या प्लॅटफॉर्मचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान हे काम पूर्ण करण्यासाठी काही एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागणार असे सांगितले जात आहे. या कामासाठी भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार गाड्या रद्द केल्या आहेत.
कोणत्या गाड्या रद्द झाल्यात ?
दादर ते बलिया दरम्यान धावणारी स्पेशल एक्सप्रेस ट्रेन 29 डिसेंबर 2023 पर्यंत रद्द करण्यात आली.
बलिया ते दादर दरम्यान धावणारी स्पेशल ट्रेन 31 डिसेंबर 2023 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
दादर ते गोरखपुर दरम्यान धावणारी गाडी 30 डिसेंबर 2023 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गोरखपुर ते दादर दरम्यान धावणारी गाडी एक जानेवारी 2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.