Mumbai Railway News : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. तसेच सणासुदीचा देखील हंगाम सुरू आहे. या चालू एप्रिल महिन्यात गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा मोठा सण सुद्धा येणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. पण गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.
यामुळे आता ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी आणि गर्दीच्या कालावधीतही प्रवाशांना वेगवान प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेने मुंबई येथून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बनारस म्हणजे वाराणसीपर्यंत विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून जाणार आहे.
यामुळे या गाडीचा मुंबईहून उत्तर महाराष्ट्राला जाणाऱ्या प्रवाशांना तसेच उत्तर महाराष्ट्रहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे. परिणामी, मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
दरम्यान, आता आपण लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत. तसेच या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे हे देखील आता आपण पाहणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक
ही गाडी मुंबईहून वाराणसीला म्हणजेच बनारसला जाणार आहे. परिणामी काशी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना या ट्रेनचा सर्वाधिक फायदा होणार आहे. खरेतर, मुंबईहून मोठ्या प्रमाणात वाराणसी येथील काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूपच मोठी आहे.
तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत ही भाविकांची संख्या आणखी वाढणार असा अंदाज आहे. यामुळे ही गाडी काशी विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष फायदेशीर राहणार आहे. या ट्रेनचा मुंबई सहित उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना देखील फायदा होणार आहे.
या ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून तीन एप्रिल ते 26 जून या कालावधीत प्रत्येक बुधवारी 12 वाजून 15 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तसेच ही गाडी दुसऱ्या दिवशी चार वाजून पाच मिनिटांनी वाराणसी या रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, ज्योनाथपूर आणि वाराणसी या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहणार आहे.