Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक कामाची ठरणार आहे. खरंतर, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रेल्वे स्थानकावर अक्षरशः पाय ठेवायला देखील जागा राहत नाहीये.
सध्या अनेकांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा प्लान बनवला आहे. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या असल्याने अनेकजण आता पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. लग्नसराई आणि निवडणुकीचा देखील काळ आहे. यामुळे सध्या विविध रेल्वे मार्गांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. अशातच मुंबईहून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी आज पासून चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि या गाडीला कोणकोणत्या ठिकाणी थांबा राहणार याविषयी माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पेशल ट्रेन आजपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि १५ तासाचा प्रवास करून दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकावर पोहचणार आहे.
यामुळे मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी या मार्गावरील जवळपास 14 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणारा असल्याने त्या सदर भागातील प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार एकेरी विशेष गाडी
सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.