Mumbai Railway News : यंदाचा गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी 7 सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या मूर्ती आता आकार घेऊ लागल्या आहेत. गणेश मंडळांची तयारी सूरु झाली आहे. खरेतर, गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात साजरा होणारा सण. महाराष्ट्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे.

राज्यातील कोकण विभागात तर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असतो. कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कोकणा बाहेर वास्तव्याला असलेली मंडळी देखील आता आपल्या गावाकडे गणेशोत्सवाचा सणाच्या निमित्ताने परतण्यासाठी सज्ज होत आहे.

Advertisement

कोकणी माणूस भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात कामाला असला तरी देखील तो गणेशोत्सवाला आपल्या गावी जात असतो. विदेशातील कोकणी माणूसही गणेशोत्सवाला गावी येण्याचा प्लॅन बनवतो. दरम्यान मुंबईत कामाला असणाऱ्या कोकणातील चाकरमानी लोकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

खरंतर दरवर्षी मुंबईहून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवाच्या सणासाठी आपल्या गावी परतत असतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्वच गाड्यांचे आरक्षण जवळपास फुल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम रेल्वे पुढे सरसावले आहे.

Advertisement

पश्चिम रेल्वेने कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाचा सण लक्षात घेता सहा विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, याआधी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे विभागाने सात विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या.

मात्र या गाड्यांची घोषणा झाल्याबरोबर आरक्षणासाठी गर्दी झाली आणि अवघ्या काही तासातच या गाड्यांचे आरक्षण फुल झाले. दरम्यान आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या आणखी सहा नवीन विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या सहा विशेष रेल्वे गाड्या कोणत्या आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

Advertisement

पश्चिम रेल्वे चालवणार सहा विशेष रेल्वे गाड्या

मुंबई सेंट्रल ते ठोकूर साप्ताहिक गणपती विशेष ट्रेन (गाडी क्र. ०९००१/०९००२)

Advertisement

मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड ही विशेष गाडी (गाडी क्र. ०९००९/०९०१०) ही आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे.

वांद्रे ते कुडाळ साप्ताहिक गणपती विशेष ट्रेन (गाडी क्र. ०९०१५/०९०१६)

Advertisement

अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक गणपती विशेष ट्रेन (गाडी क्र. ०९४१२/०९४११)

विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक गणपती स्पेशल फेअर ट्रेन (गाडी क्र. ०९१५०/०९१४९)

Advertisement

अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक गणपती स्पेशल फेअर ट्रेन (गाडी क्र. ०९४२४/०९४२३)

यातील अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक गणपती स्पेशल फेअर ट्रेन ही गाडी वगळता उर्वरित पाच गाड्यांसाठी 28 जुलै पासून आरक्षण सुरू होणार आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाने चाकरमानी लोक मोठे समाधानी असल्याचे दिसत आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *