Mumbai To Ayodhya Special Train : श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उदघाट्न 22 जानेवारी 2024 ला करण्यात आले आहे. तसेच प्रभू श्री रामरायाचे हे भव्य मंदिर 23 जानेवारीपासून रामभक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
यामुळे जगभरातील रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण असून दर दिवशी लाखो भाविक श्रीक्षेत्र अयोध्याला जाऊन रामरायाचे दर्शन घेत आहेत.
दरम्यान, देशभरातील रामभक्तांसाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा आणि मोठा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने अयोध्या येथे जाणाऱ्या भाविकांसाठी आस्था ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे.
आस्था ट्रेन राजधानी मुंबई येथूनही चालवली जाणार आहे. मुंबईहुन अयोध्यासाठी 15 आस्था ट्रेन चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खरे तर मुंबई ते आयोध्या या अप आणि डाऊन मार्गावर एकूण 30 गाड्या चालवल्या जाणार आहेत. म्हणजे या तीस गाड्यांपैकी पंधरा गाड्या मुंबईहून अयोध्याला जाणार आहेत.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते श्रीक्षेत्र अयोध्या यादरम्यान आता आस्था ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने मुंबईसहित महाराष्ट्रातील रामभक्तांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना जलद गतीने श्री क्षेत्र अयोध्या येथे पोहोचता येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आस्था ट्रेनचा संपूर्ण खर्च भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद उचलणार आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून मुंबईहुन अयोध्याला पहिली आस्था ट्रेन केव्हा धावणार हा सवाल उपस्थित केला जात होता.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की उद्या अर्थातच 29 जानेवारी 2024 ला मुंबई ते अयोध्या दरम्यानची पहिली आस्था ट्रेन राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होणार आहे.
वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रात्री १०. ३५ वाजता सुटेल आणि सुमारे ३४ तास ५५ मिनिटे प्रवास केल्यानंतर सकाळी ९.३० वाजता अयोध्या स्थानकावर पोहोचेल.
तसेच ही गाडी परतीच्या प्रवासात अयोध्येहून दुपारी ४.४० वाजता सुटणार आहे आणि १२. ४० वाजता मुंबई येथील CSMT ला पोहोचणार आहे.