Mumbai Vande Bharat News : मराठवाड्याला नुकतीच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मराठवाड्यातील जालना ते मुंबई दरम्यान ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे. ही गाडी छत्रपती संभाजी नगर व्हाया चालवली जात आहे.
या गाडीचे 30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल आहे. खरंतर ही महाराष्ट्राला मिळालेली सातवी वंदे भारत ट्रेन ठरली आहे. याआधी राज्यात अशा प्रकारच्या सहा गाड्या धावत होत्या.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या सहा मार्गांवर या गाड्या सुरू होत्या.
आता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. परिणामी मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ट्रेनने मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने मुंबईत येता येणार आहे.
परिणामी त्यांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी जलद आणि सुरक्षित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच मात्र मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटारात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीतुन छत्रपती संभाजी नगर येथून मुंबईला जाताना कमी तिकीट दर आकारले जात आहे तर मुंबईहून छत्रपती संभाजी नगर कडे जाताना अधिकचे तिकीट दर आकारले जात आहेत.
मुंबईहून छत्रपती संभाजी नगर कडे जाताना तब्बल दीडशे रुपये अधिक तिकीट दर द्यावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
एकच गाडी, अंतर सारखे तरीदेखील ही एवढी मोठी तफावत कशी हा सवाल प्रवाशांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी चेअर कार 1025 रुपये आणि एक्झिक्युटीव्ह क्लास 1930 एवढे तिकीट दर लागत आहे.
तसेच मुंबई ते छत्रपती संभाजी नगर या प्रवासासाठी चेअरकार 1175 रुपये आणि एक्झिक्युटीव्ह क्लास 2110 रुपये एवढे तिकीट दर आकारले जात आहे.