Mumbai Vs Bengalore : तुम्हीही घर घेण्याच्या तयारीत आहात का ? मात्र कुठे घर घ्यावे मुंबई की बेंगलोर यामध्ये कन्फ्युज आहात मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष फायद्याची राहणार आहे. कारण की आज आपण मुंबई आणि बेंगलोर मध्ये राहण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण कोणते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण या दोन्ही शहराच्या विशेषता पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कोणत्या शहराचे हवामान चांगले आहे?
राजधानी मुंबईत सातत्याने लोकसंख्या वाढत आहे. शिवाय मुंबई हे अधिक घनतेचे शहर आहे. म्हणजेच या शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. येथे कमी जागात अधिक लोक वास्तव्य करतात.
शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यामुळे या शहरातील हवामान हे बेंगलोरच्या तुलनेत खराब भासते. बेंगळुरूचे हवामान अतिशय आल्हाददायक आहे.
इथे खूप उष्णता किंवा जास्त थंडी नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही संपूर्ण वर्ष इथे पंख्याच्या हवेत घालवू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मध्यम हवामान आवडत असेल, तर बेंगळुरू तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
उद्योगधंद्यासाठी आणि नोकरीसाठी बेस्ट ठिकाण कोणते
दुरदुरून लोक नोकरीसाठी मुंबईत येतात आणि नंतर इथेच स्थायिक होतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण मुंबईत अनेक प्रकारची कामे सहज उपलब्ध आहेत.
विविध सेक्टरमध्ये या ठिकाणी जॉब अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतात. बंगळुरूचा विचार केल्यास, या शहरातील बहुतेक नोकऱ्या केवळ अभियंत्यांसाठीच असतात.
येथे आयटी क्षेत्रात जितक्या संधी आहेत तितक्या संधी इतर क्षेत्रात नाहीत. मात्र, आयटी आणि इतर सर्व प्रकारच्या कामांना मुंबईत समान संधी मिळते. यामुळे मुंबई, मायानगरी उद्योगधंद्यांसाठी आणि नोकरीसाठी सर्वात बेस्ट ठिकाण बनले आहे.
सर्वात सुरक्षित शहर कोणते
मोठे शहर असूनही राजधानी मुंबई खूपच सुरक्षित आहे, हे मान्य करावे लागेल. दिवसेंदिवस देशाच्या आर्थिक राजधानीची लोकसंख्या वाढत आहे मात्र येथे क्राईम रेट खूपच कमी आहे. मुंबई प्रत्येकालाच आपले बनवते ते येथील सुरक्षित वातावरणामुळे.
जर तुम्ही मुंबईची तुलना दिल्ली-बेंगळुरूसारख्या इतर मोठ्या शहरांशी केली तर येथे गुन्हेगारीचे प्रमाण तुम्हाला महाराष्ट्राच्या राजधानीत खूपच कमी असल्याचे पाहायला मिळणार आहे. मुंबईत रात्रीही मुली सुरक्षित आहेत. ते बिनधास्त फिरू शकतात.
जर आपण बेंगळुरूबद्दल बोललो तर हे शहर रात्रीच्या बाबतीत चांगले नाही. येथील गुन्हेगारीचे प्रमाण खूप जास्त आहे. बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणावर क्राईम होत आहेत.