Nashik Pune Semi High Speed Railway : गेल्या काही वर्षांमध्ये शहरा-शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. यामुळे आतापर्यंत अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. मात्र असेही काही प्रकल्प आहेत जे की अजूनही सरकारच्या मंजुरीविना सरकार दरबारी धुळखात पडून आहेत.

असाच एक प्रकल्प आहे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प. मुंबई, पुणे आणि नाशिक ही तीन शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण. जेव्हा-जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा या तीन शहरांच्या विकासावरूनच महाराष्ट्राच्या एकत्रित विकासाचे मोजमाप होत असते.

Advertisement

मात्र याच तीन शहरांपैकी दोन शहरादरम्यान स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही अजून थेट रेल्वेमार्ग नाही ही मोठी शोकांतिका आहे. पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग नसल्याने या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

यामुळे या शहरादरम्यान रेल्वे मार्ग असायला हवा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

Advertisement

पण, गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाची फाईल मंत्रालयात मंजुरी विना पडून आहे. अजूनही या फाईलवर संबंधितांकडून दखल घेतली जात नाही ही मोठी शोकांतिका आहे.

विशेष म्हणजे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील आत्तापर्यंत फारसा आवाज बुलंद केला जात नव्हता. आता मात्र लोकप्रतिनिधींना आपल्या कार्याची जाणीव झाली आहे.

Advertisement

नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा रेल्वे मार्ग प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.

भुसे यांनी या प्रकल्पाला लवकर केंद्राकडून मान्यता मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली असून यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांना पत्र देखील पाठवले आहे. भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला एप्रिल 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मंजुरी दिली.

Advertisement

नंतर जुलै 2021 मध्ये मध्य रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली. पुढे फेब्रुवारी 2022 मध्ये रेल्वे मंत्रालयाने देखील या प्रकल्पाला मान्यता देण्याचे काम केले. पण, हा प्रकल्प सध्या भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनोमिक अफेयर्स च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

या प्रकल्पासाठीचे भूसंपादन, वन हस्तांतरण आणि अन्य कामे प्रगतीपथावर आहेत. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाचे उर्वरित कामे तातडीने सुरू होतील, असे देखील भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *