Nashik To Mumbai And Pune Flight : नासिक हे मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. गेल्या काही दशकांपासून या शहराचा विकास जलद गतीने सुरु आहे. मात्र असे असले तरी या शहरातून काही मोजक्याच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या नाशिक येथील ओझर विमानतळावरून पाच शहरांसाठी केवळ सहा विमाने धावत आहेत.
मात्र आता येत्या काही महिन्यात नासिकवरून काही महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या नाशिक येथील ओझर विमानतळावरून अहमदाबाद, नागपूर, गोवा, इंदूर, हैदराबाद या पाच शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे. यापैकी अहमदाबाद शहरासाठी दोन फ्लाइट्स आहेत.
ही विमानसेवा इंडिगो या एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून पुरवली जात आहे. खरंतर काही महिन्यांपूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ओझर विमानतळावरून सेवा पुरवली जात होती. परंतु, स्पाइस जेटची आर्थिक स्थिती खराब झाल्याने कंपनीने नाशिक मधील आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण इंडिगो एअरलाइन्स कडून दिल्या जाणाऱ्या सेवेला प्रवाशांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जात आहे. पण असे असले तरी नाशिक शहराला विमानाने आणखी काही महत्त्वाची शहरे जोडणे आवश्यक आहे. यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आता हे प्रयत्न यशस्वी ठरणार असे चित्र तयार होत आहे. कारण की नासिक येथील ओझर विमानतळावरून देशातील दोन महत्त्वाच्या शहरांसाठी लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे.
आता नाशिक शहरातून नवी दिल्ली व बेंगलोर या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू होणार असे सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात ही विमानसेवा सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर 29 ऑक्टोबर 2023 पासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून नवी दिल्ली व बेंगलोर या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे याची बुकिंग एक ऑक्टोबर पासूनच होणार असा दावा केला जात आहे. तसेच या वर्षा अखेरपर्यंत वाराणसी, चेन्नई, जयपूर, कोलकत्ता या चारपैकी किमान दोन शहरांसाठी देखील सेवा सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी इंडिगोच्या सोबतीला एअर अकासा ही एअरलाइन्स कंपनी देखील सेवा सुरू करणार आहे.
मुंबई, पुण्यालासाठीही सुरू व्हावी विमानसेवा
याव्यतिरिक्त राज्यांतर्गत काही मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची मागणी आहे. खरंतर, नासिक येथून मुंबई आणि पुण्याला रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. यात उद्योजकांची, वकील, डॉक्टर यांसारख्या प्रोफेशनल्सची संख्या देखील खूपच अधिक आहे. मात्र सध्या नाशिक ते मुंबई हा प्रवास रस्ते मार्गाने करण्यासाठी सात तासांचा काळ लागत आहे.
विशेष म्हणजे नाशिक ते पुणे यादरम्यान प्रवासासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नासिक ते मुंबई आणि नासिक ते पुणे या मार्गावर विमानसेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी आहे. त्यामुळे आता या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जातो का आणि या मार्गावर विमानसेवा सुरू होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.