अनेक विद्यार्थी समाजामध्ये असे दिसून येतात की ते अलौकिक बुद्धिमत्ता असलेले असतात परंतु त्यांच्या घरची आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते.
त्यामुळे अशा बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये अनेक योजना या शिष्यवृत्ती योजना असतात व काही कर्ज स्वरूपात आर्थिक मदत देणाऱ्या योजना देखील आहेत.
तसेच अनेक बँकांच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते. याच अनुषंगाने जर आपण पाहिले तर एसटी महामंडळाने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी परदेशी शिक्षण अग्रीम योजना सुरू केली आहे. नेमकी ही योजना कशी आहे? यासंबंधीची माहिती या लेखात घेऊ.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विदेशात शिक्षणासाठी मिळणार दहा लाख
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी कर्मचाऱ्यांना अगदी कमी पगार असल्यामुळे बऱ्याचदा कर्मचाऱ्यांची मुलांना शिकवण्याची इच्छा असते किंवा विदेशात आपल्या मुलांनी शिकावे अशी इच्छा असते परंतु पैशांमुळे त्यांना उच्च शिक्षणासाठी पाठवता येत नाही.
ही समस्या डोळ्यासमोर ठेवून एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींकरिता परदेशी शिक्षण अग्रीम योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून आता परदेशात शिक्षणासाठी एसटी कर्मचाऱ्यांना बिनव्याजी 10 लाख रुपयांच्या अनुदान मिळणार आहे. एस टी महामंडळाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागतच होत आहे.
काय आहेत या योजनेच्या अटी व नियम तसेच कोणाला मिळणार लाभ?
1- या योजनेमध्ये एसटी महामंडळात जे कर्मचारी परमनंट म्हणजेच कायमस्वरूपी आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षण घेता यावे करता या अनुदान दिले जाणार आहे.
2- या अनुदानासाठी कर्मचाऱ्यांना एक जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे. एवढेच नाही तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलाने परदेशी शिक्षणाकरिता ग्राह्य आणि आवश्यक धरण्यात येणाऱ्या टोफेल आणि जीआरई या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
3- परदेशातील जी विद्यापीठे जागतिक रँकिंग मध्ये असतील अशा विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना हे अनुदान एसटी महामंडळाकडून दिले जाणार आहे.