Royal Enfield Classic 350 : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी आहे. या कंपनीचा एक मोठा फॅन बेस आहे. कंपनीची बुलेट गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरलेली आहे. याशिवाय रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 या गाडीचा देखील एक मोठा फॅन बेस पाहायला मिळतो.

खेडे असो की शहर सर्वत्र रॉयल एनफिल्डच्या क्लासिक गाडीचे शौकीन पाहायला मिळतात. दरम्यान रॉयल एनफिल्डची क्लासिक गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 खरेदी करू इच्छित असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.

Advertisement

खरेतर सध्या दिल्लीतील प्रगती मैदान येथे भारत मोबिलिटी एक्सपो सुरु आहे. आज पासून या एक्सपोला सुरुवात झाली आहे. हा एक्सपो 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या एक्सपोमध्ये देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी आपले प्रॉडक्ट सादर केले आहेत. याच एक्सपोमध्ये रॉयल इन्फिल्डने देखील आपले एक नवीन प्रॉडक्ट सादर केले आहे.

कंपनीने फ्लेक्स फ्युलवर चालणारी मोटरसायकल प्रदर्शित केली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 फ्युल फ्लेक्स इंजिनवर तयार केली आहे. म्हणजे ही नवीन गाडी आता इथेनॉल मिक्स पेट्रोल वर चालणार आहे. या नुकत्याच सादर झालेल्या गाडीचे इंजिन मात्र आधीच्या जुन्या गाडी सारखेच आहे. इंजिन मध्ये कोणताच बदल झालेला नसल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

या फ्युल फ्लेक्स इंधनाची किंमत ही पेट्रोल पेक्षा कमी असते. याला E20 या नावानेही ओळखले जाते. एकंदरीत भविष्यात आता रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 फ्युल फ्लेक्सवर चालवली जाणार असल्याने ग्राहकांच्या इंधनावरील खर्च कमी होणार आहे. कारण की, पेट्रोल पेक्षा हे इंधन स्वस्त पडते. या फ्युल फ्लेक्समध्ये म्हणजेच इथेनॉल मिक्स पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल असते आणि 80% पेट्रोल असते.

हेच कारण आहे की या इंधनाला E20 हे नाव पडले आहे. दरम्यान पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केले जात असल्याने या इंधनाची किंमत कमी आहे. परिणामी जर रॉयल इन्फिल्ड क्लासिक 350 इथेनॉल मिक्स पेट्रोलवर धावू लागली तर ग्राहकांच्या इंधनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. यामुळे या गाडीच्या खपत मध्ये आणखी वाढ होईल यात शंकाच नाही.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *