Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जुनी पेन्शन योजना या कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही याबाबत केंद्रीय वित्त सचिवांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केल्यास देशातील सर्वसामान्य नागरिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक दृष्ट्या हानिकारक ठरणार असे प्रतिपादन केंद्रीय वित्त सचिवांनी केले आहे.
अर्थातच जुनी पेन्शन योजना लागू होणारच नाही असे संकेत वित्त सचिवांनी दिले आहेत. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. खरेतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधीच जुनी पेन्शन योजने संदर्भातील आपली भूमिका सरकारने स्पष्ट केली होती.
त्यावेळी संसदेत सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजने संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना सरकारने सध्या स्थितीला जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव सरकार तरकारी विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान आता केंद्रीय वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांनी जुनी पेन्शन प्रणाली म्हणजे OPS बाबत एक विधान केले आहे. सोमनाथन यांनी म्हटल्याप्रमाणे ओ पी एस योजना आता आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही. ही योजना लागू केल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये नसलेल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे.
वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांचे हे विधान OPS ची अपेक्षा करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक आहे. तथापि, सोमनाथन म्हणाले की एनपीएस संदर्भात कर्मचारी संघटना आणि राज्य सरकारांशी काही अर्थपूर्ण चर्चा झाली आहे.
पण, NPS वर स्थापन केलेल्या समितीचे काम अजून पूर्ण झालेले नाही. याबाबत आम्ही कर्मचारी संघटना आणि राज्य सरकारांशी बोललो आहोत. यामध्ये काही प्रगती झाली आहे. अशा परिस्थितीत, एनपीएसच्या समितीच्या सूचना यायला वेळ लागणार आहे.
एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केली जाऊ शकत नाही असे वित्त सचिवांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जुनी योजना लागू होईल अशी आशा बाळगून असणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2004 नंतर रुजू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र सरकारने जुनी योजना लागू होऊ शकत नाही असे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.