Onion Rate Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांद्याच्या बाजार भावात तब्बल पाच महिन्यांचा प्रदीर्घ कालावधीनंतर मोठी वाढ नमूद केली जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फेब्रुवारी ते जून दरम्यानच्या कालावधीत कांद्याला मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळत होता. काही बाजारात याहीपेक्षा कमी दर मिळाला होता. परिणामी पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नव्हता.
परिस्थिती एवढी बिकट होते की अनेकांना वाहतुकीसाठी केलेला खर्च देखील मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी पाहायला मिळत होती. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर नाफेड कडून कांदा खरेदी सुरू झाली. तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात पूर्ववत झाली. शिवाय आता बाजारात चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. यामुळे सध्या बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.
जवळपास दहा ते बारा दिवसांपासून आता राज्यातील प्रमुख बाजारात कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1,500 प्रतिक्विंटल या सरासरी बाजार भावात विक्री होत आहे. कमाल बाजार भावाने तर 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा टप्पा गाठला आहे.
काल चंद्रपूर गंजवड एपीएमसी मध्ये कांद्याला तब्बल 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आज देखील राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला चांगला विक्रमी बाजारभाव मिळाला आहे.
या बाजारात मिळाला सर्वोच्च बाजारभाव
आज राज्यातील पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 2600 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव मिळाला आहे. आज या एपीएमसीमध्ये 399 क्विंटल कांद्याची आवक झाली.
आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 2400 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान आणि 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे सरासरी दर देखील 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.