Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळतोय. कांदा निर्यातीसाठी सरकारने कठोर निर्बंध लावलेले असतानाही बाजारात कांदा भाव खात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्क आकारले जात आहे.

मात्र असे असतानाही देशांतर्गत कांदा चांगल्या दरात विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण, सरकारने ताबडतोब कांदा निर्यातीसाठी लावलेले कठोर निर्बंध शिथिल केले पाहिजे जेणेकरून बाजार भाव आणखी वाढतील आणि शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांमध्ये झालेले नुकसान भरून काढता येईल अशी इच्छा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

Advertisement

यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. खरेतर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र हे कांदा उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. येथे कांदा हेच प्रमुख पीक आहे.

यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील सरकार राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देऊ शकते अन निर्यातीसाठीचे कठोर निर्बंध मागे घेईल असे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात सरकार कांदा निर्यातीसाठी लावण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

Advertisement

दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च दर मिळाला आहे. या बाजारात आज कांद्याला कमाल 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.

या बाजारात कांद्याला किमान 3500, कमाल 4500 आणि सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील काही इतर बाजारांमधील बाजार भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार, कमाल 2875 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला.

दिंडोरी वणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2561, कमाल 2920 आणि सरासरी 2699 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3001 आणि सरासरी 2750 असा दर मिळाला आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1645, कमाल 2700 आणि सरासरी 2440 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2951 आणि सरासरी 1975 असा भाव मिळाला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3000 आणि सरासरी 2400 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1326, कमाल 2900 आणि सरासरी 2675 असा भाव मिळाला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : नाशिक एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 800, सरासरी 2500 आणि कमाल 2900 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 900, कमाल 2706 आणि सरासरी 2550 असा भाव मिळाला आहे.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात एक नंबर कांद्याला आज किमान 2400, कमाल 3100 आणि सरासरी 2550 असा भाव मिळाला आहे. तसेच दोन नंबर कांद्याला किमान 1800, कमाल 2300 आणि सरासरी 2150 भाव मिळाला आहे. शिवाय तीन नंबर कांद्याला या मार्केटमध्ये आज किमान 500, कमाल 1700 आणि सरासरी 1450 असा दर मिळाला आहे.

Advertisement

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1400, कमाल 3000 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.

सांगली फळे भाजीपाला मार्केट : या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 3000 आणि सरासरी 2000 असा दर मिळाला आहे.

Advertisement

साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याला किमान 2000, कमाल 2750 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 200, कमाल 3250 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

मुंबई कांदा आणि बटाटा मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 2400, कमाल 2900 आणि सरासरी 2650 असा दर मिळाला आहे.

चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3000, कमाल 4000 आणि सरासरी 3500 असा दर मिळाला आहे.

Advertisement

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान एक हजार, कमाल 3300 आणि सरासरी 2300 असा दर मिळाला आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *