Online Marriage Certificate : महाराष्ट्रातील नवविवाहितांसाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. खरे तर लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनमोल क्षण असतो. लग्न ही दोन व्यक्तींना जोडणारी गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर विविध कागदपत्रांमध्ये बदल करावा लागत असतो. लग्नानंतर महिलांचे आधार कार्ड वरील नाव चेंज करावे लागते. तसेच इतरही महत्त्वाच्या कागदपत्रांवरील महिलेचे नाव बदलत असते.

आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता अपडेट करण्यासाठी मात्र मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असते. याशिवाय मॅरेज सर्टिफिकेट चा इतरही अनेक कामांमध्ये उपयोग होतो. पण हे मॅरेज सर्टिफिकेट काढताना सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता मात्र सर्वसामान्यांची ही अडचण कायमची दूर होणार आहे.

Advertisement

कारण की आता फक्त दहा मिनिटात आणि तेही घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट काढता येणार आहे. यासाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण घरबसल्या म्हणजे मोबाईल वरूनच मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट कस काढायच

Advertisement

घरबसल्या मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये Mahaegram Citizen Connect हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. हे एप्लीकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध होणार आहे. एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या एप्लीकेशन मध्ये लॉगिन घ्यावे लागणार आहे.

मग तुम्हाला तुमचे अकाउंट क्रिएट करायचे आहे. यासाठी तुम्हाला नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई- मेल आयडी अशी माहिती फिलअप करावी लागणार आहे. यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावर एक मेसेज येणार आहे. या मेसेज मध्ये युजर आयडी आणि पासवर्ड राहणार आहे.

Advertisement

तुम्ही हा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन घेऊ शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर आयडी असतो. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड दिसेल यात विवाह नोंदणी हा पर्याय असेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असणारा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. यामध्ये नवरा आणि नवरीची सर्व डिटेल माहिती भरावी लागणार आहे. यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड असे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. येथे तुम्हाला तुमच्या लग्नाला उपस्थित साक्षीदारांची नावे आणि त्यांची माहिती द्यावी लागणार आहे.

Advertisement

यानंतर तुम्हाला लग्नाची पत्रिका, लग्नाचे फोटो असे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे आहेत. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळेल हा क्रमांक घेऊन जाऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधून मॅरेज सर्टिफिकेट मिळवू शकता.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *