Online Voter ID Card : पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाचणार आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत. एकंदरीत निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजु लागले आहेत.
विपक्ष मध्ये असलेल्या नेत्यांनी देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान मत देण्याचा अधिकार बजावण्याठी सर्वसामान्य मतदार देखील तयार आहेत. शासनाने केलेल्या कामाच्या आधारावर आता मतदाराजा मतदानासाठी सज्ज होत आहे.
पण आपल्या देशात मतदानासाठी मतदान कार्ड लागते. हे मतदान कार्ड म्हणजेच वोटर आयडी कार्ड फक्त मत देण्यासाठीच उपयोगाला येते असे नाही तर हे एक प्रमुख शासकीय कागदपत्र म्हणून देखील वापरले जाते. मतदान कार्डाला इलेक्टर फोटो आयडेंटी कार्ड म्हणून ओळखतात आणि हे भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना बहाल केले जाते.
अठरा वर्षांवरील व्यक्तींसाठी मतदान कार्ड जारी केले जाते. दरम्यान आज आपण नवीन मतदान कार्ड कसे काढायचे तसेच मतदान कार्ड मध्ये जर काही चूक झाली असेल तर ती कशी दुरुस्त करायची याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एप्लीकेशनच्या माध्यमातून काढता येणार नवीन मतदान कार्ड
नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी, तसेच जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर दुसरे मतदान कार्ड मागवण्यासाठी आणि मतदान कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी निवडणुक आयोगाच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय भारतीय नागरिक voter helpline हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील नवीन मतदान कार्ड काढू शकणार आहेत. हे एप्लीकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर वोटर हेल्पलाइन असे सर्च करून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. किंवा https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर सहजतेने इन्स्टॉल करू शकणार आहात.
अँप्लिकेशनच्या माध्यमातून कसे काढायचे नवीन मतदान कार्ड
Voter Helpline एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर जर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचे असेल तर न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6 ( new voter registration form 6) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला न्यू यूजर या पर्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागणार आहे. यासोबतच काही आवश्यक कागदपत्रे देखील तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या पत्त्यावर तुमचे मतदान कार्ड येऊन जाईल.
मतदान कार्डमध्ये दुरुस्ती कशी करणार
जर तुमचे मतदान कार्ड तयार असेल मात्र त्यामध्ये तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल तर वोटर हेल्पलाइन या ॲप्लिकेशनमध्ये जा. तेथे गेल्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला करेक्शन ऑफ इंट्रीज फॉर्म 8 या पर्यावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तिथे विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि काय करेक्शन करायचे आहे याबाबत तुम्हाला माहिती भरायची आहे. ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. एवढे केले की तुमच्या मतदान कार्ड मधील करेक्शन पूर्ण होईल आणि तुमचे नवीन मतदान कार्ड तुमच्या पत्त्यावर काही दिवसात पोच होईल.