OYO Hotel Room Booking : अनेकजण फिरण्यासाठी दुसऱ्या शहरात जात असतात. मात्र फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांना रूम बुक करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. हॉटेल मालकांकडून रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड मागितले जात असते.
जर सदर व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला रूम मिळत नाही. विशेषतः हॉटेल चालकांकडून रूम देताना प्रेमी जोडप्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते. अविवाहित जोडप्यांना आधार कार्ड विना हॉटेल चालकांकडून रूम दिला जात नाही. यामुळे
अनेकांच्या माध्यमातून खरंच हॉटेलमध्ये मुक्काम राहण्यासाठी किंवा काही कालावधीसाठी आराम करण्यासाठी रूम बुक करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक आहे का? हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान याच प्रश्नाचे आज आपण सविस्तर उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना किंवा कोणत्याही इतर व्यक्तीला रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे की नाही, याबाबत काही कायदा आहे का? सरकारने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत का? याविषयी जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निकालात हॉटेलमधील रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे की नाही हे स्पष्ट करून देण्यात आले आहे.
काय म्हणतय सर्वोच्च न्यायालय
माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी देताना हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नसल्याचे महत्त्वाचे जजमेंट पास केले आहे.
माननीय न्यायालयाने असे म्हटले आहे की हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक राहणार नाही.
याऐवजी रूम बुक करण्यासाठी वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक वहीत पुरावा सादर करू शकता.
यामुळे आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून कोणत्याच हॉटेल चालकाला रूम देण्यास मनाई करता येणार नाही. हॉटेल चालकाचा वैध पूरावा मागणे हा अधिकार आहे. मात्र फक्त आधार कार्डच द्या असे बंधन हॉटेल चालकाला घालता येणार नाही.