Pan Card And Aadhar Card Update : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. या कागदपत्रांची कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये गरज भासत असते. आधार आणि पॅन हे भारतीय नागरिकांचे दोन महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहेत. पॅन कार्डचा वापर हा वित्तीय कामांमध्ये केला जातो. यासोबतच याचा वापर अनेक शासकीय कामांसाठी होतो.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड देखील विविध शासकीय कामांमध्ये आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते. मात्र अनेकांच्या पॅन कार्डवर चुकीचे नाव असते. अशावेळी पॅन कार्ड धारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून जर पॅन कार्ड वरील नाव आधार कार्ड प्रमाणे नसेल तर काय केले पाहिजे, पॅन कार्ड वरील नाव कसे चेंज करायचे असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण पॅन कार्ड वरील नाव चेंज करण्याची सविस्तर प्रोसेस अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पॅन कार्ड वरील नाव कसे चेंज करणार
जर तुमच्याही पॅन कार्डवर आधार कार्डसारखे नाव नसेल म्हणजे पॅन कार्ड वरील नाव चुकीचे असेल तर आता तुम्ही घरबसल्या ही चूक दुरुस्त करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला भारतीय आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यायची आहे. पॅन कार्ड वरील नाव चेंज करण्यासाठी www.incometaxindia.gov.in या आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. आता येथे तुम्हाला पॅन नंबर वापरून लॉग इन करावे लागणार आहे.
यानंतर पॅन कार्ड दुरुस्तीचा पर्याय निवडावा लागणार आहे. मग तुम्हाला पॅन कार्ड दुरुस्तीसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
यानंतर, फॉर्म सबमिट करायचा आहे. यासाठी तुम्हाला अंदाजे 106 रुपये भरावे लागतील. पॅन कार्ड वरील दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला हे शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल.
पावतीवर दिलेल्या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमचे अपडेट केलेले पॅन कार्ड कधी वितरित केले जाईल याचा मागोवा घेऊ शकता. याशिवाय तुम्ही NSDL e-Gov पोर्टलद्वारे सुद्धा पॅन कार्डमध्ये सुधारणा करू शकता.