Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर, दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून म्हणजेच दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत असतो.

यंदा मात्र डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा उलटला आहे पण तरीही थंडीचा जोर वाढत नाहीये. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान निवळले आणि थोडासा गारठा वाढला होता. यामुळे आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार अशी आशा होती.

Advertisement

पण अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानाने मोठी कलाटणी घेतली आहे. राज्यात आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असे सांगितले आहे.

पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 17, 18 आणि 19 डिसेंबर रोजी बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. या कालावधीत राज्यातील सोलापूर, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

Advertisement

याशिवाय सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील हजेरी लावणार आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात पडणारा हा पाऊस सर्व दूर पडणार नसून तुरळक ठिकाणीच पडेल याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. सोलापूर व्यतिरिक्त राज्यातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.

मात्र तीन दिवसानंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामान कोरडे होणार आहे. राज्यात 20 डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यामुळे आगामी तीन दिवस राज्यातील काही भागातून पुन्हा एकदा गारठा कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

पंजाबरावांसोबतच भारतीय हवामान विभागाने देखील आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *