Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीला सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
16 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. राज्यातील विदर्भ, मराठवाडा या विभागात अवकाळी पावसाचे सावट होते. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यात या कालावधीत गारपीट देखील झाली.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढली आहे. अशातच, आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
आगामी दहा दिवस महाराष्ट्रात कसे हवामान राहणार, पाऊस हजेरी लावणार का ? या संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. एवढेच नाही तर मान्सून 2024 संदर्भात देखील डख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कसे राहणार आगामी दहा दिवसाचे हवामान ?
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात आगामी 10 दिवस म्हणजेच मार्च अखेरपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आगामी दहा दिवस इथे हवामान कोरडे राहील, पण काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते.
मराठवाडा आणि विदर्भ बाबत बोलायचं झालं तर येथे देखील आगामी दहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. आता या विभागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाही.
पण विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ तथा पूर्व विदर्भात दिवसाचे कमाल तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या विभागातील दिवसाचे कमाल तापमान 40°c पार जाणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे. यामुळे सर्वसामान्यांना विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
मान्सून 2024 बाबत काय म्हटलेत
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा मान्सून हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. महाराष्ट्रात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होणार आहे. म्हणजेच यावर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी योग्य पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळणार अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. निश्चितच जर पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.