Panjabrao Dakh Havaman Andaj October 2023 : अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ तयार झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात हामून चक्रीवादळ तयार झाले आहे. 2018 नंतर प्रथमच एकाच वेळी अरबी समुद्रात आणि बंगालच्या खाली चक्रीवादळ तयार झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने या दोन्ही चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही आणि पाऊस पडणार नसल्याचे जाहीर केले आहे. हवामान खात्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचे सांगितले आहे. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडणार नाही असे चित्र तयार होत आहे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मान्सून संपल्यानंतर अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे.
गेल्या वर्षी देखील हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. यंदा देखील अवकाळी पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे. अवकाळी पाऊस हा शेती पिकांसाठी घातक ठरतो मात्र यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने अवकाळी का होईना फक्त पाऊस पडावा असे शेतकरी सांगत आहेत. पण डिसेंबर पर्यंत यंदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात 3 नोव्हेंबर पर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही. राज्यात 3 नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पण तदनंतर राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असे त्यांनी सांगितले आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. तसेच राज्यात 26 ऑक्टोबर पासून थंडीचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे काही भागात दसऱ्यापासूनच थंडीला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यातील नाशिक, निफाड व आजूबाजूच्या परिसरात आज पासून थंडी वाढण्यास सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.