Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. आधी राज्यात 16 मार्चपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला होता. यानुसार राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिट झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिक गारपिटीमुळे नेस्तनाभूत झाले आहे.
शेती पिकांची मोठी हानी झाली असून आगामी काही दिवस महाराष्ट्रात असाच वादळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज समोर येत आहे. हवामान खात्याने देखील राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने आज राज्यातील विदर्भ विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज दिला आहे. अशातच आता पंजाबरावांनी सुद्धा एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
या नव्याने जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजामध्ये डख यांनी राज्यात 21 मार्च 2024 पर्यंत अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार असे म्हटले आहे. आता आपण पंजाब रावांनी दिलेला नवीन सुधारित हवामान अंदाज जाणून घेणार आहोत.
काय म्हणताय डख
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पूर्व विदर्भात 18 मार्च ते 21 मार्च दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे. कालावधीत राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया यवतमाळ आणि गडचिरोली या भागात वादळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत तेलंगणा आणि छत्तीसगड मध्ये मोठा पाऊस पडणार असल्याने याचा फटका महाराष्ट्राला बसणार असा अंदाज आहे. या कालावधीत तेलंगणाजवळील जिल्ह्यात व तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार अशी शक्यता आहे.
अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा येथे सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा जोर थोडासा कमी राहणार आहे. तेथे खूप मोठा पाऊस पडणार नाही.
पण, पूर्व विदर्भात मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी 20 दिवस कुठेच पाऊस पडणार नाही. दुसरीकडे मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता नाहीये, पण तेथे ढगाळ हवामान राहणार असा अंदाज आहे.
शिवाय 22 मार्चनंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढणार आहे. 22 तारखेनंतर राज्यातील काही भागांमधील तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल असा अंदाज यावेळी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी दिला आहे.