Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर आज भारतीय हवामान विभागाने 2024 च्या मान्सून बाबतचा आपला पहिला-वहिला अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने यंदाच्या मानसून मध्ये अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 या मानसून कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या वर्षी सामान्य मान्सून राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे यंदा मान्सूनचे आगमन आठ जून 2024 ला होण्याची शक्यता आहे. अर्थातच यावर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होणार असे संकेत IMD ने दिले आहेत.
यंदाच्या मान्सून मध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होऊ शकतो असे आधीच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने म्हटले होते. आता भारतीय हवामान विभागाने देखील स्कायमेटच्याच अंदाजाला दुजोरा देण्याचे काम केले आहे.
यामुळे जर हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आणि यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाले आणि चांगला मान्सून राहिला तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मान्सून जर वेळेवर आला आणि मान्सून काळात चांगला पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होणार आहे.
अशातच मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अवकाळी पावसाबाबत मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाचे सत्र आणखी सात दिवस सुरू राहणार आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी 21 एप्रिल पर्यंत पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. म्हणजे राज्यात 21 एप्रिल पर्यंत पाऊस सुरूच राहणार असे डख यांनी यावेळी आपल्या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पाऊस होणार नाही तर काही भागातच अवकाळी पाऊस होणार आहे.
या कालावधीत राज्यातील दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे या भागात पाऊस होणार असल्याने याचा फटका मराठवाड्याला देखील बसणार आहे आणि या कालावधीत मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.