Panjabrao Dakh Havaman Andaj : मे महिना सुरू झाला की मान्सूनची आतुरता लागते. गेल्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली असल्याने यंदा शेतकरी बांधव मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनच महाराष्ट्रात आगमन कधी होणार, खरीप हंगामातील पेरण्या कधीपर्यंत होणार ? या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरे तर भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाच्या शक्यता वर्तवली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावर्षी एल निनोचा प्रभाव राहणार नाही, ला निनाचा प्रभाव राहील अन यामुळे चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान तज्ञांनी यावर्षी मान्सून वेळे आधीच दाखल होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या समुद्रावरील हवेचा दाब वाढू लागला आहे. प्रचंड उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून यामुळे हवेचा दाब वाढत आहे. सध्या समुद्रावरील हवेचा दाब 850 हेक्टोपास्कल एवढा आहे.
जेव्हा हा हवेचा दाब 1000 हेक्टोपास्कल पर्यंत पोहोचेल त्यावेळी मान्सूनची निर्मिती होणार आहे. दरम्यान यंदा लवकरच हवेचा दाब 1000 हेक्टोपास्कल पर्यंत जाणार असून मानसून आगमन वेळी आधीच होऊ शकते असा अंदाज आहे.
पंजाबरावांनी काय म्हटलंय?
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 22 जूनच्या सुमारास मानसून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रात यावर्षी 12 ते 13 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो. खरे तर दरवर्षी सात जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होत असते.
पण पंजाबरावांनी यावर्षी 12-13 जूनला मानसून आगमन होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजे यंदा मान्सून आगमन काहीसे विलंबाने होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस 22 जून नंतर पडणार ते देखील पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात खरीप हंगामातील पेरण्या जून अखेरीस होतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तथापि, यावर्षी त्यांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे 2024 च्या मान्सून काळात जुन मध्ये कमी पाऊस राहणार आहे.
पण, जुलैमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट मध्ये कमी पाऊस होणार असा अंदाज असून पुढे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये चांगला पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याने या कालावधीत राज्यातील सर्व प्रमुख तलाव, धरणे भरतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.