Panjabrao Dakh Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. एप्रिल महिन्यात खरंच अवकाळी पाऊस पडणार का ? यासंदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरे तर, भारतीय हवामान विभागाने नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला असून यानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाच एप्रिल पासून ते 8 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, पाच ते आठ एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच कोकण आणि मराठवाड्यात सहा एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नुकताच मार्च महिन्याचा शेवट झाला आणि गेल्या महिन्याच्या शेवटी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. आता भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
5 एप्रिलपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. दरम्यान, याच संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी देखील आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
काय म्हणताय पंजाबराव
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, राज्यात एप्रिल महिन्यात देखील अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार अशी दाट शक्यता आहे. त्यांनी राज्यात आणखी दोन दिवस अर्थातच 5 एप्रिल पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज दिला आहे.
गेल्या महिन्याच्या शेवटी त्यांनी हा अंदाज दिला होता. यानुसार राज्यात पाच एप्रिल पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहील मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार असे त्यांनी म्हटले होते.
महाराष्ट्रात 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल ला पुन्हा पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत पावसाची तीव्रता देखील अधिक राहणार आहे.
गेल्या महिन्यात शेवटी राज्यात अवकाळी पाऊस झाला मात्र खूपच हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आता, मात्र पावसाची तीव्रता अधिक राहू शकते असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसतो का हे खरंच पाहण्यासारखे राहणार आहे.