Panjabrao Dakh News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे अनेक भागात आत्तापासूनच पाण्याची टंचाई पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत.
अजून तर उन्हाळ्याचे तीन महिने काढायचे आहेत. यावरून आपल्याला भविष्यात पाण्याची कशी भीषण परिस्थिती राहू शकते हे समजतंच असेल.
यामुळे 2024 मध्ये मान्सून काळात पाऊसमान कसा राहणार ? 2023 प्रमाणेच 2024 मध्येही दुष्काळ पडणार का ? असे काही महत्वाचे सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, आज आपण पंजाबरावं डख यांनी दुष्काळाबाबत दिलेली महत्त्वाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दुष्काळ केव्हा पडतो ? हे कसे ओळखायचे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हटले पंजाब डख
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ पडणार की नाही याचे संकेत निसर्ग देत असतो. म्हणजेच कोणत्या वर्षी दुष्काळ पडणार हे आधीच निसर्ग सुचित करत असतो.
ते म्हणतात की, ज्या वर्षी 11 जूनला दुपारी बारा वाजता आकाशाकडे पाहिले असता सूर्याला घळ म्हणजे रिंगण पडलेले दिसेल त्यावर्षी हमखास दुष्काळ पडण्याची भीती असते.
ज्या वर्षी अशी परिस्थिती तयार होते त्यावर्षी दुष्काळ पडतोच असा दावा पंजाबरावांनी केला आहे.
याशिवाय, बिब्याच्या ( खानदेशसहित संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात याला भिलावा म्हणून ओळखल जात) झाडाला अधिक प्रमाणात जर फुलधारणा झाली तसेच मोठ्या प्रमाणात जर गावरान आंबे पिकलेत, गावरान आंब्याचे सर्वाधिक उत्पादन झाले तर त्यावर्षी दुष्काळ पडणार म्हणजे पडणार असे निरीक्षण पंजाबरावांनी नोंदवले आहे.
यासोबतच कावळ्याने झाडाच्या उंच शेंड्यावर म्हणजे मध्यभागी घरटे न करता थेट शेंड्यावर घरटे केले की त्यावर्षी पाऊस हा कमी होत असतो असा मोठा दावा पंजाबरावांनी यावेळी केला आहे.