Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान आंदाज सांगितला आहे. खरंतर राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. राज्यातील नागपुर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बीड यासह विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे.
प्रामुख्याने नागपूर विभागात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. नागपुर विभागात गेल्या दोन दिवसांपूर्वी अर्थातच शुक्रवारी 22 तारखेला मध्यरात्री ढगफुटी सारखा पाऊस झाला होता. या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक मध्यवर्ती भागांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते.
आपण राजधानी मुंबईची तुंबई झाल्याचे अनेकदा पाहिले असेल मात्र यंदा उपराजधानी नागपूरमध्ये देखील पाण्याची प्रचंड तुंबई झाली होती. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. पण ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने चिंतेत सापडलेले शेतकरी या जोरदार पावसामुळे सध्या समाधानी आहेत.
मात्र काही ठिकाणी जास्तीचा पाऊस होत असल्याने तेथील जमिनी खरडल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचे या जास्तीच्या पावसाने नुकसान देखील होत आहे. दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे आता राज्यात 28 सप्टेंबर पर्यंत अर्थातच अनंत चतुर्दशी पर्यंत भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवसापर्यंत यावर्षी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा सर्वदूर राहणार नाही तर तो भाग बदलत पडत राहील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. या कालावधीत राज्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, बुलढाणा तसेच खानदेश मधील जळगावसह संपूर्ण राज्यात भाग बदलत पाऊस पडत राहणार असा अंदाज आहे.
याशिवाय पंजाब रावांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि कामाचा सल्ला दिला आहे. डख यांनी शेतकरी बांधवांनी 3 ऑक्टोबर पर्यंत आपली सोयाबीन जर काढणीवर आले असतील तर काढून घ्यावीत असे सांगितले आहे. कारण की राज्यात 5 ऑक्टोबर नंतर बहुतांशी भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच डख यांनी यावर्षी दिवाळीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावर्षी दसरा आणि दिवाळीचा सण देखील पावसातच साजरा करावा लागेल असे त्यांनी सांगितले आहे. सोबतच त्यांनी यावर्षी 10 ऑक्टोबर नंतर देशातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.