Panjabrao Dakh October Havaman Andaj : येत्या दोन दिवसात ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ऑक्टोबर मध्ये कस हवामान राहतं, पाऊस पडणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरंतर गेल्या महिन्यापर्यंत महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होता. पण सप्टेंबर मध्ये राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला किंचित का होईना दिलासा मिळाला आहे.
पण जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात पावसाने ब्रेक घेतला असल्याने सरासरी भरून काढण्यासाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच राज्यातील काही भागात सप्टेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस झाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देखील चांगला पाऊस झाला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात कस हवामान राहणार, पाऊस पडणार का याबाबत पंजाबराव यांनी मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणताय पंजाबराव?
डख यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबर नंतर अर्थातच गांधी जयंतीनंतर कडक सूर्यदर्शन होणार आहे. अर्थातच ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. परंतु राज्यातील काही भागात 5, 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, उदगीर, लातूर या भागात थोड्या प्रमाणात पाऊस बरसणार असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र या कालावधीमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. परंतु नवरात्र उत्सवाच्या काळात पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यात पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
यंदा नवरात्र उत्सवाला 15 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी अर्थातच विजयादशमीच्या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान या नऊ दिवसांच्या काळात यंदा जोरदार पाऊस पडू शकतो असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.