Personal Loan Interest Rate : तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा तयारीत आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. पैशांची अडचण भासली तर बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा सर्वात सोयीचा आणि चांगला पर्याय ठरतो यात शंकाच नाही.
पण वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे इतर कर्जाच्या तुलनेत अधिक असतात याची काळजी ग्राहकाने घेणे आवश्यक आहे. यामुळे खूपच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढावे अन्यथा इतर मार्गांनी पैशांची उपलब्धता करावी असे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.
तथापि, जर तुम्हाला खूपच आवश्यकता असेल आणि तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर जी बँक तुम्हाला सर्वात कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देईल त्या बँकेकडून कर्ज घेणे परवडणार आहे.
ॲक्सिस बँक ही देखील खाजगी क्षेत्रातील अशी एक बँक आहे जी आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करत असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान आज आपण ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक कर्जाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ॲक्सिस बँकेचे पर्सनल लोनसाठीचे व्याजदर किती
मिळालेल्या माहितीनुसार, प्रायव्हेट सेक्टरमधील ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 10.25 टक्के या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करत आहे. परंतु बँकेचे हे व्याजदर ज्या लोकांचा सिबिल स्कोर खूपच स्ट्रॉंग असतो त्यांनाच लागू होणार आहे.
म्हणजेच ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 800 किंवा 800 च्या जवळपास असतो अशा लोकांना या व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळू शकते. ज्यांचा सिबिल स्कोर मात्र यापेक्षा कमी असेल त्यांना कदाचित अधिकचे व्याज द्यावे लागू शकते.
5 लाखाचे कर्ज 5 वर्षासाठी घेतले तर किती व्याज द्यावे लागणार
जर समजा तुम्हाला 10.25% टक्के या बँकेच्या किमान व्याजदरात पाच लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर झाले तर 10 हजार 685 रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे या कालावधीत तुम्हाला एक लाख 41 हजार रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे. अर्थातच मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम असे एकूण सहा लाख 41 हजार रुपये तुम्हाला पाच वर्षांच्या कालावधीत सदर बँकेला द्यावे लागणार आहे.