Personal Loan : आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची गरज भासली की आपण आपल्या मित्रांकडे, नातेवाईकांकडून पैशांची ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर पैशांची ऍडजेस्टमेंट झाली नाही तर आपण बँकेत जातो आणि पर्सनल लोनसाठी अप्लाय करतो.
इमर्जन्सी मध्ये बँकेकडून घेतलेले वैयक्तिक कर्ज फायद्याचे ठरते यात शंकाच नाही. मात्र, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे खूप अधिक असतात यामुळे जेव्हा कुठूनच पैशांचे ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारला पाहिजे हे देखील तेवढेच खरे आहे.
दरम्यान जर तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच फायद्याची ठरणार आहे.
कारण की, आज आपण वैयक्तिक कर्ज घेतांना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून स्वस्तात वैयक्तिक कर्ज उपलब्ध होईल आणि वैयक्तिक कर्ज फेडताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
चांगला क्रेडिट स्कोअर असायलाच हवा : बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना पहिल्यांदा तुमची क्रेडिट हिस्टरी चेक करतात. तुमची क्रेडिट हिस्टरी चेक करण्यासाठी बँका तुमचा क्रेडिट स्कोअर पाहतात. हा क्रेडिट स्कोअर कर्ज परतफेड करण्याची तुमची क्षमता दर्शवतो.
हा स्कोर जनरली 300 ते 900 दरम्यान असतो. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो असा सिबिल चांगला समजला जातो. यामुळे हा स्कोर कसा चांगला ठेवता येईल याकडेच आपले विशेष लक्ष राहिले पाहिजे.
विविध बँकेशी तुलना करा : तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर सर्वप्रथम बँकांचे व्याजदर तपासा. विविध बँकांसोबत व्याजदराची तुलना करा. व्याज शुल्क, प्रक्रिया शुल्क, कर्जाची रक्कम यासह सर्व अटी आणि शर्ती हे तपासा यानंतर जें कर्ज तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल तेच कर्ज घ्या.
कर्जाची किंमत तपासा : वैयक्तिक कर्जामध्ये प्रक्रिया शुल्क, प्रीपेमेंट शुल्क, विलंब शुल्क इत्यादींसह विविध खर्चांचा समावेश असू शकतो. म्हणून, कर्ज घेण्याच्या आणि परतफेड करण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व खर्चांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.
कर्जाची परतफेड करण्याची तुमची क्षमता पहा : पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता तुम्ही स्वतः तपासून पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी तुम्ही तुमचे मासिक उत्पन्न तपासले पाहिजे.
तुमच्या मासिक उत्पन्नातून कर्जाचा हप्ता वजा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या संसाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती पैसा शिल्लक राहतो. हा शिल्लक राहिलेला पैसा तुमच्या संसाराच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे का ? याची तुम्ही एकदा चाचपणी केली पाहिजे.