Petrol And Diesel Price August 2024 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती ठरवल्या जात असतात. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आणि आजही गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर म्हणजेच निळ्या रंगाचे 19 किलो वजनी गॅस सिलेंडरची किंमत ही 6.50 ते 8.50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राची राज्य राजधानीत म्हणजे मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत सात रुपयांनी वाढली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढली आहे.
पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत म्हणजे 14.2 किलो वजनी लाल रंगाच्या गॅस सिलेंडरची किंमत कायम आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही.
यामुळे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार नाहीये. पण अप्रत्यक्षरीत्या का होईना याचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.
जसे महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर होत असतात तसेच दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. देशातील इंधन कंपन्या रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करत असतात.
आज देखील म्हणजेच एक ऑगस्टलाही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे भाव खालील प्रमाणे
राजधानी मुंबई : पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.
उपराजधानी नागपूर : पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.७४ रुपये आहे.
नाशिक : पेट्रोल १०४.०९ रुपये प्रति लिटरवर विकले जाते तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे.
ठाणे : पेट्रोलची किंमत १०३.८९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.४० रुपये आहे.
पुणे : पेट्रोलचे दर १०३.७६ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ९०.२९ रुपये आहे.