Petrol Diesel Price Will Decrease : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात महागाईचा आलेख मोठा वाढला आहे. पेट्रोल डिझेलसह सर्वच जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे बजेट महागाईमुळे कोलमडलेले आहे. सर्वसामान्यांच्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होऊ लागला आहे. यामुळे संसाराचा गाडा चालवावा तरी कसा हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
अशातच आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमती बाबत लवकरच केंद्र शासन मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे आहे. खरंतर पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
शिवाय या वर्षाच्या अखेरीस देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तसेच पुढील वर्षी आपल्या महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत.
एकंदरीत आता निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांना महागाईतून दिलासा देण्यासाठी विविध निर्णय घेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता गॅस सिलेंडर 200 रुपयांनी कमी मिळत आहे.
सोबतच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत देखील मोदी सरकारने शंभर रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे आता गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्यानंतर केंद्र सरकार देशातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
किती कमी होणार पेट्रोल डिझेलचे दर ?
तज्ञांनी आगामी काही दिवसात देशात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली आहे. तज्ञांच्या मते गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने आणि निवडणुकीचा काळ जवळ येत असल्याने केंद्रातील मोदी सरकार आता पेट्रोल-डिझेलच्या किमती पाच ते सहा रुपयांनी कमी करेल असा विश्वास तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
कच्च्या तेलाच्या किमती आता कमी झाल्या असून सध्या कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल ७५.९५ डॉलरवर आले आहेत. याचा परिणाम म्हणून देशात आता लवकरच पेट्रोल डिझेलच्या किमती पाच ते सहा रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या दरात घसरण झाली असल्याने महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडेसे कमी झाले आहेत.
देशातील तेल कंपन्यांनी सोमवारी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. या जारी केलेल्या नवीन दर पत्रकानुसार महाराष्ट्रात पेट्रोल सोमवारपासून प्रतिलिटर १ रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ९७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये केंद्र शासनाकडून पेट्रोल डिझेलच्या किमती पाच ते सहा रुपयांनी कमी केल्या जाणार आहेत.
सध्या देशभरातील विविध शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच्या आसपास विक्री होत आहे तर डिझेल 90 रुपयाच्या आसपास विकले जात आहे. पण यात आता पाच ते सहा रुपयांची घसरण होऊ शकते असा दावा तज्ञांनी केला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.