Petrol Diesel Rate : केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर उद्या पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा होतील अशी शक्यता आहे. दरम्यान, हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीचं सर्वसामान्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले आहेत. यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. ऐन अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवसआधीचं देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले आहेत.
खरं तर गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढलेल्या दरामुळेही सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होत आहे. दरम्यान आता देशाचा बजेट सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे.
देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले आहेत. दरम्यान आता आपण देशातील कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या शहरांमध्ये घसरलेत पेट्रोल आणि डिझेलचे दर
तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. यानुसार देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात काही किरकोळ घसरण पाहायला मिळाले आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरले आहेत आणि याचा परिणाम आपल्या देशातही पाहायला मिळत आहे. याचं घसरलेल्या किमतीच्या प्रभावामुळे देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किरकोळ कमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज देशातील सर्वात मोठ्या राज्यात अर्थातच उत्तरप्रदेशच्या काही मोजक्याच शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.
आज गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पेट्रोल १५ पैशांनी आणि डिझेलच्या दरात १८ पैशांनी घसरण झाली आहे. गाझियाबादमध्ये सुद्धा पेट्रोल १२ पैशांनी आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे.
दुसरीकडे हरियाणामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. हरियाणाची राजधानी अर्थातच गुरुग्राममध्ये आज पेट्रोल १४ पैशांनी आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे.
महाराष्ट्रात कशी आहे परिस्थिती?
देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत पण आपल्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. मुंबईसह पुणे आणि इतर महत्वाच्या शहरात इंधनाचे दर स्थिर आहेत. अर्थातच राज्यात अजून इंधनाचे दर कायम आहेत.