PF Account Balance Check : जर तुम्हीही एखाद्या कंपनीत कामाला असाल आणि तुमच्याही पगारातून पीएफ कट होत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी आहे. कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम कपात केली जाते आणि ती पीएफ खात्यात जमा केली जाते.
विशेष म्हणजे कर्मचारी सोबतच कंपनी देखील या पीएफ खात्यात योगदान देत असते. पीएफ फंड मध्ये कर्मचारी आणि कंपनीकडून योगदान मिळते सोबतच यामध्ये इन्वेस्ट होणाऱ्या पैशांवर व्याज मिळते.
अशा परिस्थितीत वेळोवेळी पीएफ खात्यातील रक्कम चेक करत राहिले पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून पीएफचे योगदान दिले जात आहे की नाही हे समजू शकेल.
यामुळे आज आपण पीएफ खात्यातील रक्कम चेक कशी करायची याविषयी जाणून घेणार आहोत. खरंतर पीएफ खात्यातील रक्कम चेक करण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत.
मात्र आज आपण इंटरनेट चालू नसले तर पीएफ खात्यातील बॅलन्स कसा चेक करायचा याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विना इंटरनेट पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करण्याची पद्धत
एसएमएस करून चेक करता येणार पीएफ बॅलन्स : जर तुम्हाला बिना इंटरनेट पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही एसएमएस करून हा बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्हाला EPFOHO आणि तुमचा UAN क्रमांक लिहून 7738299899 वर मेसेज करायचा आहे.
यानंतर तुम्हाला एक एसएमएस पाठवला जाईल ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याविषयी सविस्तर माहिती दिलेली राहणार आहे.
कॉल करूनही पीएफ खात्यातील बॅलन्स पाहता येणार : मेसेज व्यतिरिक्त तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही बॅलन्स तपासू शकणार आहात. यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावरून एक मिस कॉल द्यायचा आहे.
9966044425 या क्रमांकावर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल द्यावा लागेल. मिस कॉल दिल्यानंतर मग तुमच्या फोनवर एक मेसेज पाठवला जाईल. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती दिलेली राहणार आहे.
एकूणच काय की, एसएमएस करून आणि मिस कॉल देऊन देखील आता पीएफ खात्यातील रक्कम पाहता येणार आहे.