PF Account Balance Check : जर तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला असाल आणि तुमच्या पगारातून पीएफ म्हणून पैसे कापले जात असतील तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
खरंतर कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस किंवा पीएफ कट केला जात असतो. ज्या पगारदार व्यक्तीच्या पगारातून टीडीएस कट होतो अशा व्यक्तीच्या पगारातून पीएफ कट होत नाही. तर, ज्या पगारदार व्यक्तीच्या पगारातून पीएफ कट होतो अशा व्यक्तीच्या पगारातून टीडीएस कट होत नाही.
दरम्यान जर तुमच्या पगारातून पीएफ कट होत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खूपच उपयोगी अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण पीएफ खात्यात किती रक्कम आहे हे कसे चेक करायचे याबाबत जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम आपण पीएफ म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारातून किती रक्कम कट होते याबाबत समजून घेऊया. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, कंपनीत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा बेसिक पे आणि डीएचा १२ टक्के हिस्सा पीएफ म्हणून कट केला जात असतो. पीएफ म्हणून कट झालेल्या या पैशांना सरकारकडून व्याज दिले जात असते.
यामुळे या पैशांचा कर्मचाऱ्यांना भविष्यात उपयोग होतो. हे पैसे कर्मचाऱ्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी पडत असतात. विशेष बाब म्हणजे पीएफ म्हणून कर्मचाऱ्यांकडून 12% रक्कम कापली जाते तर कंपनीकडूनही १२ टक्के योगदान दिले जाते. म्हणजेच जेवढे पैसे कर्मचाऱ्यांकडून कापले जातात तेवढेच पैसे कंपनीकडूनही मिळतात.
यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळत असतो. पण कंपनी कॉन्ट्रीब्युशनमधून म्हणजे कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या 12% योगदानापैकी ३.६७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात क्रेडिट केली जाते.
तर उर्वरित ८.३३ टक्के रक्कम ही पेन्शन स्कीममध्ये जमा केली जात असते. आता आपण पीएफ खात्यात कंपनीकडून खरच पैसे जमा होत आहेत का? तसेच पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे हे कसे पाहायचे याविषयी जाणून घेणार आहोत.
पीएफ खात्यातील रक्कम कशी तपासणारयासाठी तुम्हाला ईपीएफओ च्या वेबसाईटवर जावे लागेल. तुम्ही https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला Services या पर्यायावर क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला For Employees हा पर्याय सिलेक्ट करावा लागणार आहे. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
या पेजवर तुम्हाला सर्विसेस मध्ये Member Passbook नावाचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड इंटर करायचा आहे. यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेंबर आयडी टाकावा लागेल. दिलेल्या रकान्यात मेंबर आयडी टाकला की मग तुमच्या स्क्रीनवर तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची डिटेल समोर येणार आहे. या ठिकाणी तुमची सर्व आवश्यक माहिती दिलेली असेल. अशा तऱ्हेने तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम चेक करू शकणार आहात.