Phone Pay Personal Loan Details : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशनचा वापर मोठा वाढला आहे. विशेषतः जेव्हापासून केंद्रातील मोदी सरकारने रोकड व्यवहाराऐवजी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे तेव्हापासून आपल्या देशात ऑनलाइन पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे.
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर होत आहे. यासाठी वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरल्या जात आहेत. त्यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे यांसारख्या विविध अप्लिकेशन्स बाजारात आल्या आहेत.
फोन पे चा विचार केला असता ही देशातील एक प्रमुख डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहे. या एप्लीकेशनचे करोडो ग्राहक आहेत. ही एप्लीकेशन आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा पुरवत आहे.
या एप्लीकेशनच्या सहाय्याने बँकेत पैसे पाठवणे, QR कोडंच्या सहाय्याने पैसे पाठवणे, मोबाईल रिचार्ज करणे, डिश टिव्ही रिचार्ज करणे, एलआयसीचा प्रीमियम भरणे, एखाद्या कर्जाचा ईएमआय भरणे यांसारखी एक ना अनेक कामे केली जात आहेत.
यामुळे या एप्लीकेशनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच आता करोडो फोन पे वापरकर्त्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे फोन पे आपल्या ग्राहकांना आता पर्सनल लोन देखील देणार आहे. ही नवीन सुविधा येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
त्यासाठी पाच बँक आणि एनबीएफसी सोबत करार होईल, विशेष म्हणजे या बँकानी फोन पे वापरकर्त्यांना कर्ज देण्यासाठी आपली सहमती दर्शवली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
खरे तर या आधी देखील या कंपनीने जीवन, आरोग्य, मोटार आणि कार विमा या पॉलिसी सेवा आपल्या ग्राहकांना पुरवल्या आहेत. दरम्यान, आता फोन पे पर्सनल लोन देखील देईल अशी माहिती समोर आली आहे.
यामुळे गरजू लोकांना याचा मोठा फायदा होईल आणि त्यांना त्वरित कर्ज मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप या लोन संदर्भात मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. पण या लोनचा फायदा काही विशिष्ट लोकांनाच होणार आहे.
दरम्यान सध्या फोन पे च्या माध्यमातून आपल्या डेटाबेस मधून अशा पात्र लोकांचा शोध घेतला जात असल्याचे समोर येत आहे. यामुळे आता लवकरच फोन पे लोनसाठी कोणते ग्राहक पात्र राहतील याची घोषणा करेल अशी शक्यता आहे.