Pik Vima Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे फळ पिक विमा योजनेबाबत. खरंतर, फळ पिक विमा योजनेत केळी या पिकाचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.
या आधी केळी पिकाचा पळ पिक विमा योजनेत समावेश नव्हता. पण गेल्यावर्षीपासून हे देखील पिक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील प्रमुख केळी उत्पादक पट्ट्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान यंदा केळी पिकाचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. 31 ऑक्टोबर 2023 ही शेवटची मुदत होती मात्र या मुदतीत राज्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा भरता आला नाही.
यामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विमा भरण्यासाठी आणखी मुदत वाढ दिली पाहिजे अशी मागणी केली जात होती. यासाठी शिंदे सरकारकडे पाठपुरावा सुरू होता.
राज्यातील केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जात होता.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून कारभार पाहत असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे देखील याबाबत शेतकऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात आला होता.
कृषिमंत्री महोदय यांनी देखील राज्यातील केळी उत्पादकांची ही मागणी केंद्राकडे पोहच केली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे पिक विमा मुदतीत काढता आला नाही.
यामुळे केळी पिकाचा विमा भरण्यासाठी आणखी काही दिवस मुदत दिली पाहिजे अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी दिल्ली दरबारी केळी पिकाचा विमा काढणे हेतू मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
दरम्यान मुंडे यांची ही मागणी केंद्रशासनाने मान्य केली असून आता केळी पिकाचा विमा 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत काढता येणार आहे. याबाबतची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली आहे.
यामुळे राज्यातील प्रमुख केळी उत्पादक पट्ट्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना केळी फळ पिक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी लवकरात लवकर पीक विमा भरण्याचे आवाहन केले जात आहे.