Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत योजना असून याची सुरुवात 2019 मध्ये झाली. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण सोळा हप्ते वितरित करण्यात आले आहेत. खरेतर या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपये वितरित केले जातात.
आतापर्यंत या योजनेचे 16 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आगामी सतराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. युतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे.
या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला जाहीर केला जाणार आहे. अशातच मात्र पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
पीएम किसान योजनेच्या पुढील 17व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार लवकरच पीएम किसान योजनेच्या कोट्यावधी लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे.
मागील सोळावा हफ्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला वितरित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता यवतमाळ येथील एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.
जस की आपणास ठाऊकच आहे की ही केंद्रीय पुरस्कृत योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी जारी केला जातो. म्हणजे एका वर्षात 3 हप्ते दिले जातात.
पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. चालू आर्थिक वर्ष 2024-25 चा पहिला हप्ता आता जारी केला जाणार आहे.
योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला असल्याने, 17 वा हप्ता मे महिन्यात येणे अपेक्षित आहे. काही रिपोर्ट्सनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुढील हफ्ता रिलीज होऊ शकतो.
पण, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापि याबाबत सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.