Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली आहे.
तेव्हापासून आत्तापर्यंत ही योजना अविरतपणे सुरू आहे. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ मिळत आहे. 2 हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने एका वर्षात तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळत आहेत.
दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहेत. मागील 14 वा हफ्ता 27 जुलै 2023 रोजी पीएम मोदी यांनी राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देशभरातील पात्र साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता.
दरम्यान या योजनेचा पंधरावा हप्ता केव्हा जमा होणार हा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरंतर उद्यापासून देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. उद्यापासून सुरू होणारा हा पावन पर्व 24 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. 24 तारखेला नवरात्र उत्सवाची सांगता होईल तसेच विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सणही साजरा होणार आहे.
अशा या सणासुदीच्या दिवसात आगामी हफ्ता दिला गेला पाहिजे असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण की या योजनेचा पंधरावा हप्ता हा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 15वा हफ्ता हा 12 नोव्हेंबरपूर्वी म्हणजे दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेऊ शकते.