Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नववर्षाच्या आधीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
पी एम किसान ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची रक्कम मिळते. यामुळे गरजू शेतकऱ्यांच्या संसाराला मोठा हातभार लागतो.
पण ही रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी दिली जात नाही. टप्प्याटप्प्यावर हा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचा पैसा शेतकऱ्यांना मिळतो.
आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.nयामुळे आता शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याचे वेध लागले आहे.
सोळावा हप्ता केव्हा जमा होणार हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणत्या तारखेला जमा होऊ शकतो याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
केव्हा जमा होणार पीएम किसानचा पुढील हफ्ता
पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत 15 हप्ते मिळाले आहेत. मागील पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी यांनी हा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला.
याचा लाभ देशातील जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आता सोळावा हप्ता हा नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला जमा होईल असा दावा केला जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. यानुसार आता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 16वा हफ्ता जमा करण्याचे नियोजन आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या 16 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो हप्ता नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार हे स्पष्ट होत आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.