Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. यात अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा देखील समावेश होतो.
या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान पुरवले जाणार आहे. 1 किलोवॅट पासून ते 10 किलोवॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी शासन अनुदान देणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचे स्वरूप कसे राहणार ?
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंत मोफत मिळू शकणार आहे. यासाठी शासनाकडून सोलर पॅनल बसवणे हेतू अनुदान दिले जाणार आहे. एक किलोवॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल साठी अनुदान दिले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना 30,000 पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. दोन किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना 60,000 पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. तसेच 3 किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि 10 किलोवॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजाराचे अनुदान मिळणार आहे.
अर्ज कसा करायचा आहे ?
यासाठी इच्छुक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://pmsuryaghar.gov.in या शासनाने सुरू केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटवर भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे.
यासाठी राज्य, वीज वितरण कंपनी, वीज बिल क्रमांक, मोबाइल क्रमांक, ईमेल प्रविष्ट करा. एवढे केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होणार आहे. मग मोबाइल आणि ग्राहक क्रमांकासह लॉग इन करा. यानंतर तुम्हाला रुफटॉप सोलर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला डिस्कॉमच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डिस्कॉमची मंजुरी मिळाली की मग नंतर डिस्कॉमच्या नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित करावे लागणार आहे. सोलर पॅनल इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्हाला प्लांट तपशील प्रविष्ट करायचे आहेत. तसेच नेट मीटरसाठी अर्ज करायचा आहे.
नेट मीटर इन्स्टॉलेशन आणि डिस्कॉम पडताळणीनंतर, पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. यानंतर पोर्टलवर बँक तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान 30 दिवसांच्या आत बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
आता सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्जही मिळणार?
विशेष बाब अशी की आता नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान तर मिळणारच आहे शिवाय यासाठी कर्ज देखील मिळू शकणार आहे. त्यामुळे ज्या इच्छुकांना सोलर पॅनल बसवायचे असेल मात्र त्यांच्याकडे सोलर पॅनल बसवण्यासाठी पैसे नसतील त्यांना देखील सोलर पॅनल बसवता येणार आहे.
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत, तुम्ही तीन किलोवॅटपर्यंतचे सौर पॅनेल लावल्यास, तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळेल. सौर पॅनेलसाठी उपलब्ध असलेल्या कर्जावरील व्याजदर देखील खूप कमी आहे, सोलर पॅनल बसवण्यासाठी घेतलेल्या कर्जावर ग्राहकांना सात टक्के एवढे व्याज द्यावे लागणार आहे.