Pm Surya Gruh Yojana : आज केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आज 29 फेब्रुवारी 2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये मोदी कॅबिनेटने पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेची संपूर्ण देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटीहून अधिक परिवारांना सोलर पॅनल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यामुळे सर्वसामान्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज वापरता येईल अशी अशा व्यक्त होत आहे. परिणामी, सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार नाही असे बोलले जात आहे.
दरम्यान, याच योजनेला आज केंद्रातील मोदी सरकारने मान्यता दिली आहे. आज 29 फेब्रुवारीला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अंतर्गत आता एक कोटी घरांना सोलर पॅनल बसून दिले जाणार आहेत. यामुळे वीज ग्राहकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे वीजबिलापोटी खर्च होणारे भरमसाठ पैसे सेव होणार आहेत.
या योजनेमुळे सर्वसामान्यांची वर्षाकाठी खर्च होणारी 15000 रुपयांपर्यंतची रक्कम वाचणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पीएम सूर्य घर मोफत विज योजनेची चर्चा होत होती त्या योजनेला आज अधिकृतरित्या मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारीला केली होती आणि यानुसार आता ही योजना संपूर्ण देशभरात राबवण्यास मोदी कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबाला सोलर पॅनल बसवता येणार आहे.
यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान पुरवले जाणार आहे. दोन किलोवॅटपर्यंतच्या रुफ टॉप सोलर प्लांटची किंमत 145,000 रुपये एवढी राहील अन सरकार यासाठी 78,000 रुपये एवढी सबसिडी देणार अशी माहिती समोर आली आहे.
https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे तसेच याच संकेतस्थळावर त्यांना या योजनेसाठी अर्ज देखील करता येणार आहे.