Police Complaint : गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बेरोजगारीमुळे तरुण युवक अक्षरशः हताश झाले आहेत. नोकरी लागत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील अनेकांना नोकरीं मिळत नाही. यामुळे तरुण वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः कोरोना काळापासून अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कंपनीतून नोकर कपात देखील केली आहे. यामुळे नोकरीबाबत तरुण वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे.
अशा स्थितीत आता तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी अधिक आकृष्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी नोकरीमध्ये असणारी सुरक्षितता आता तरुणांना हवीहवीशी वाटत आहे. खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत असल्याने आता अनेक युवक सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत.
दरम्यान, सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या अनेक युवकांचा असा प्रश्न असतो की, त्यांच्यावर जर पोलीस स्टेशनंमध्ये एफआयआर दाखल झाली असेल तर ते सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतात की नाही ? अनेकांना तर पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाली म्हणजे ते सरकारी नोकरी करूच शकत नाही अस वाटतं आहे.
अशा परिस्थितीत आज आपण जर एखाद्या व्यक्तीवर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाली असेल तर तो व्यक्ती सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतो की नाही याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत कायदेतज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.
कायदे तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीवर एफआयआर दाखल झाली असेल तरी देखील तो सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकतो. फक्त जर एखाद्या व्यक्तीविरोधात गुन्हा सिद्ध झाला असेल तर तो व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरू शकतो.
अर्थातच किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत एफआयआर दाखल झालेला व्यक्ती देखील सरकारी नोकरीसाठी पात्र राहणार आहे.