Post Office FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने विविध ठिकाणी गुंतवणूक करत असतात. मात्र असे असले तरी आजही अनेक जण बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवतात.
बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये एफडी केल्यास एक निश्चित परतावा मिळतो आणि येथे केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही काहीशी अधिक आहे. विशेष म्हणजे अलीकडे बँकांच्या माध्यमातून एफडी साठी चांगले व्याज देखील दिले जात आहे.
परिणामी एफडी करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. आधी महिला गुंतवणूकदार सोने, चांदीत गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत मात्र आता महिला गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात एफडी योजनेत गुंतवणूक करत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून टाईम डिपॉझिट स्कीम सुरु करण्यात आली आहे. या स्कीमला अनेकजण पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणूनही ओळखतात. या योजनेतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा ही मिळत आहे.
पोस्ट ऑफिस कडून मिळालेल्या माहितीनुसार टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याज ऑफर केले जात आहे.
यामध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% आणि दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के एवढे व्याज दिले जात आहे. तीन वर्षाच्या कालावधीच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.1% आणि पाच वर्षांच्या कालावधीच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.5% एवढे व्याज दिले जात आहे.
किमान गुंतवणुकीची मर्यादा
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट म्हणजेच TD योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा आहे मात्र कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत ग्राहक किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. मात्र या ठिकाणी कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाहीये. म्हणजेच गुंतवणूकदार त्याला हवे तेवढे पैसे या योजनेत गुंतवू शकतो आणि यावर त्याला व्याज मिळत राहणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर मिळणार आहे परंतु व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाणार आहे.
2 वर्षासाठी 5 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?
पोस्ट ऑफिसच्या 2 वर्षांच्या टीडी योजनेत जर पाच लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर 5 लाख 74,441 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. म्हणजे 74 हजार 441 रुपये व्याज स्वरूपात सदर गुंतवणूकदाराला मिळणार आहेत.
5 वर्षासाठी पाच लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत पाच वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 7 लाख 24 हजार 974 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे अर्थातच 2 लाख 24 हजार 974 रुपयांची रक्कम सदर गुंतवणूकदाराला व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहे.