Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे थोडे जोखीमपूर्ण पर्याय आहेत. तर बँकेची एफ डी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळणार आहे.
खरे तर पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. याच बचत योजनांपैकी एक बचत योजना आहे टाईम डिपॉझिट स्कीम. टाईम डिपॉझिट अकाउंट मध्ये गुंतवणूकदारांना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.
वास्तविक ही बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे. यामुळे याला पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.
दरम्यान जर गुंतवणूकदाराने या योजनेत पाच वर्षांसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळणार याविषयी आज आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती व्याज मिळते
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते.
नवीनतम आकडेवारीनुसार, या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या कालावधीसाठी 6.9%, दोन वर्षाच्या कालावधीसाठी 7.0%, तीन वर्षांच्या कालावधीसाठी 7.1% आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी 7.5% एवढे व्याजदर दिले जात आहे.
हा व्याजदर ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. व्याज दर 3 महिन्यांनी सुधारित केले जाते. व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते आणि वार्षिक आधारावर अदा केली जाते.
5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयेत गुंतवले तर 7.5 टक्क्यांच्या आधारे मॅच्युरिटी वर गुंतवणूकदारांना सात लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच 2 लाख 25 हजार रुपये एवढे व्याज पाच वर्षांच्या कालावधीत मिळणार आहे. या पाच वर्षाच्या टाईम डिपॉझिट स्कीमची विशेषता म्हणजे यावर कर बचतीचा फायदा मिळतो.