Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. आपल्याकडील पैसा वाढावा असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय बँकेची एफडी योजना, आरडी योजनेत देखील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जातात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका बचत योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हीडेंट फंड या योजनेची माहिती पाहणार आहोत. खरे तर ही योजना फक्त पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे असे नाही तर बँकेत देखील पब्लिक प्रॉव्हिडंट फंड साठी अकाउंट ओपन केले जाऊ शकते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही गुंतवणुकीची एक सुरक्षित योजना आहे. जर गुंतवणूकदारांनी दररोज 250 रुपये सेव करून या योजनेत पैसे गुंतवले तर त्यांना तब्बल 24 लाख रुपयांपर्यंतचा फंड मिळू शकणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच 24 लाख रुपयांचा फंड कशा तऱ्हेने मिळू शकतो याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम
पीपीएफ या स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.1% या रेटने इंटरेस्ट दिले जात आहे. ही योजना पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या स्कीम मध्ये वार्षिक किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये एवढी रक्कम गुंतवता येते.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दररोज 250 रुपये वाचवलेत म्हणजेच महिन्याकाठी 7500 वाचवलेत आणि या योजनेत गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी गुंतवणूकदाराला 24 लाख 40 हजार 926 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये तेरा लाख पन्नास हजार रुपयांची गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित पैसे अर्थातच दहा लाख 90 हजार 926 रुपये हे त्या गुंतवणूकदाराला मिळणारे व्याज राहणार आहे.
या योजनेत गुंतवणूक केल्यास कर द्यावा लागतो का
कर बचतीच्या दृष्टिकोनातून पीपीएफ ही एक चांगली योजना मानली जात आहे. ही EEE श्रेणीची योजना आहे. म्हणजे Exempt Exempt Exempt श्रेणीतली योजना आहे. यामध्ये दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर, गुंतवलेल्या रकमेवर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर आणि मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या संपूर्ण रक्कमेवर कोणत्याच प्रकारचा टॅक्स अर्थात कर लागत नाही.
म्हणजे या योजनेतल्या गुंतवणूक, व्याज/परतावा आणि परिपक्वता या तिन्ही बाबींवर कर लागत नाही. विशेष म्हणजे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कर्ज देखील मिळते. कर्ज हे गुंतवलेल्या रकमेवर आधारित असते.
तसेच या कर्जासाठी पीपीएफमधून जेवढे व्याज मिळत आहे त्यापेक्षा एक टक्का अधिकचे व्याजदर द्यावे लागते. अर्थातच सध्या पीपीएफ मध्ये 7.1% या दराने व्याज मिळत असल्याने जर पीपीएफच्या गुंतवणुकीवर कर्ज काढले तर 8.1% या दराने व्याज द्यावे लागणार आहे.