Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. आपला संसाराचा गाडा चालवून उरलेला पैसा प्रत्येक जण कुठे ना कुठे गुंतवत असतो. काहीजण सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात. काहीजण रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात.
तर काहीजण बँकेची एफडी योजना, आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना यांसारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदाराने 50,000 रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना कायम 3300 रुपये मिळणार आहेत. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस एमआयएस योजना.
या स्कीम मध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर मग गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट मिळते. या स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात रिटर्न मिळत असतात.
यात गुंतवणूकदार जी रक्कम गुंतवतात त्या रकमेच्या मोबदल्यात मंथली इन्कम किंवा पेन्शन स्वरूपात रिटर्न मिळते. व्याजाची ही रक्कम गुंतवणूकदारांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये एकदा 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला 275 रुपये मिळतात.
या हिशोबाने 50,000 च्या गुंतवणुकीत 3300 रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार आहेत. जर समजा या स्कीममध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला महिन्याला व्याज म्हणून 550 रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच एक लाख रुपये गुंतवणूक करून एका वर्षात गुंतवणूकदाराला 6 हजार 600 रुपये मिळणार आहेत, तसेच पाच वर्षात 33 हजार रुपये सदर गुंतवणूकदाराला मिळणार आहेत.
या योजनेमध्ये सिंगल अकाउंट ओपन केल्यास साडेचार लाख रुपये आणि जॉइंट अकाउंट ओपन केल्यास 9 लाख रुपये गुंतवणूक करता येते.
म्हणजेच या रकमेपेक्षा अधिकची गुंतवणूक गुंतवणूकदाराला करता येणे अशक्य आहे. तसेच या योजनेत किमान एक हजार रुपये आणि नंतर 100 च्या पटीत गुंतवणूक वाढवता येते.