Property News : येत्या 17 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन भेटले आहे. नवीन वर्षात अनेकजण नवीन वास्तू खरेदी करण्याचा विचार करत असतील. खरेतर वर्षाच्या सुरुवातीलाच घर खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते.

जर तुम्ही नवीन वर्षात घर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल किंवा नवीन वर्षात एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा तुमचा बेत असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

Advertisement

आज आपण 2024 मध्ये घर खरेदीसाठी चांगले शुभ मुहूर्त कोणते आहेत ? याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरतर हिंदू सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी तिथी आणि शुभ वेळ तपासली जाते.

ब्राह्मणांकडून किंवा ज्योतिष तज्ञांकडून शुभ कार्य करण्यापूर्वी तिथे आणि शुभ वेळ काढली जाते आणि मगच कोणतेही शुभ कार्य सुरू होते. अशुभ काळात केलेल्या कामामुळे नकारात्मकता येते. त्यामुळे हिंदू सनातन धर्मात शुभ मुहूर्तावरच शुभ कार्य केले जातात.

Advertisement

नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, नवीन वाहन खरेदी करायचे असो, नवीन अलंकार खरेदी करायची असेल, लग्न असो, घर खरेदी करायची असो किंवा अन्य काही शुभ कार्य असो प्रत्येक कार्यापूर्वी शुभ मुहूर्त काढले जातात आणि शुभमुहूर्तावरच कार्य केले जातात. अशा परिस्थितीत आज आपण 2024 मध्ये घर खरेदी करण्यासाठीच्या शुभ मुहूर्तांची यादी पाहणार आहोत.

जानेवारी 2024 मध्ये घर खरेदी करण्यासाठीच्या शुभ तारखा

Advertisement
  1. 11 जानेवारी 2024
  2. २५ जानेवारी २०२४
  3. २६ जानेवारी २०२४
  4. 23 फेब्रुवारी 2024
  5. एक मार्च 2024
  6. 29 मार्च 2024
  7. १२ एप्रिल २०२४
  8. 18 एप्रिल 2024
  9. 19 एप्रिल 2024
  10. 25 एप्रिल 2024
  11. ३ मे २०२४
  12. १७ मे २०२४
  13. 23 मे 2024
  14. 24 मे 2024
  15. ६ जून २०२४
  16. ७ जून २०२४
  17. 21 जून 2024
  18. 27 जून 2024
  19. ५ जुलै २०२४
  20. ११ जुलै २०२४
  21. 25 जुलै 2024
  22. २६ जुलै २०२४
  23. १५ ऑगस्ट २०२४
  24. १६ ऑगस्ट २०२४
  25. 23 ऑगस्ट 2024
  26.  29 ऑगस्ट 2024
  27. 12 सप्टेंबर 2024
  28. १३ सप्टेंबर २०२४
  29. 26 सप्टेंबर 2024
  30. 27 सप्टेंबर 2024
  31. 17 ऑक्टोबर 2024
  32. 25 ऑक्टोबर 2024
  33. १ नोव्हेंबर २०२४
  34. ७ नोव्हेंबर २०२४
  35. 21 नोव्हेंबर 2024
  36. १९ डिसेंबर २०२४
  37. 20 डिसेंबर 2024
  38. 26 डिसेंबर 2024

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *