Property Rights : आपल्या देशात संपत्तीबाबत महत्वाचे कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेळोवेळी संपत्तीच्या कायद्यांमध्ये सुधारणा देखील झाली आहे. मात्र असे असले तरी भारतीय कायद्यांमधील तरतुदी बाबत सर्वसामान्यांना फारसे ज्ञान नसते.
कायद्यामधील तरतुदी या सर्वसामान्यांना समजतील एवढ्या सोप्या भाषेत नसतात यामुळे या तरतुदींबाबत सर्वसामान्य लोकांना फारसे ज्ञान अवगत नसते. म्हणून सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याच कारणामुळे अनेकदा संपत्तीवरून कुटुंबांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळतात.
अनेकदा हे वादविवाद भांडणाचे स्वरूप घेतात आणि मग हे प्रकरण न्यायालयात पोहोचते. संपत्तीचे वादविवाद न्यायालयात गेल्यानंतर लवकर त्याचे निकाल लागत नाही यामुळे संपत्ती बाबत मोठी रस्सीखेच सुरू राहते.
दरम्यान आज आपण हिंदू वारसा कायदा मधील एका महत्त्वाच्या तरतुदी बाबत जाणून घेणार आहोत. आज आपण विवाहित मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळतो का? याबाबत कायद्यात काय तरतूद आहे ? याविषयी डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विवाहित मुलींना वडिलांच्या संपत्तीत अधिकार असतो का?
हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 अर्थातच हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये याबाबत तरतूद आहे. खरंतर हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये 2005 ला बदल करण्यात आला. यानुसार, आता विवाहित मुलींचे वडिलांच्या मालमत्तेवरील अधिकार बदलत नाहीत.
म्हणजे लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क अबाधित असतो. वडिलांच्या संपत्तीवर जेवढा हक्क मुलाचा असतो तेवढाच हक्क विवाहित मुलीचा देखील आहे. यांमुळे जर विवाहित मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा दिला नाही तर ती माननीय न्यायालयात धाव घेऊ शकते.
मात्र असे असले तरी काही प्रसंगी विवाहित मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीवर दावा ठोकता येत नाही. जर वडिलांनी मृत्यूपूर्वी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावे केलेली असेल तर अशा संपत्तीवर विवाहित मुलींना दावा करता येत नाही.
शिवाय वडिलांची जी प्रॉपर्टी स्वयअर्जित असते म्हणजेच स्वतःच्या कमाई वर घेतलेली असते अशी प्रॉपर्टी कोणाला द्यायची हा वडिलांचा वैयक्तिक अधिकार असतो. अशा प्रॉपर्टीवर मुलांना आणि मुलींना अधिकार सांगता येत नाही.
जर वडिलांनी अशी प्रॉपर्टी मुलांना देण्यास नकार दिला तर कोणालाच या प्रॉपर्टीवर दावा करता येत नाही. म्हणजे वडिलांच्या नावे असलेल्या वडीलोपार्जित संपत्तीवर विवाहित मुलींना देखील मुलांप्रमाणेच समान अधिकार असतो.
पण जर वडिलांनी मृत्यूपूर्वी अशी प्रॉपर्टी मुलाच्या नावे केली असेल तर मुलीला अशा संपत्तीवर अधिकार सांगता येत नाही. शिवाय जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने प्रॉपर्टी कमावलेली असेल तर अशा प्रॉपर्टीवर मुला-मुलींना दावा करता येत नाही. अशी स्वकष्टाने कमावलेली प्रॉपर्टी वडील त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतात.